संविधान जाळल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने निषेध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे : दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकानी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज उत्सव हॉटेल चौकात संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान जाळणाऱ्या व्यक्तींचा निषेध करून त्या समाजकंटकांच्या मागे कोणत्या शक्तिंचा हात आहे, याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी युवक अध्यक्ष राकेश कामठे, पर्वेती रा. कॉग्रेस अध्यक्ष शशिकांत तापकीर, शहर उपाध्यक्ष नितीन कदम, सामाजिक न्याय विभागाचे पंडित कांबळे, पर्वती युवक अध्यक्ष अमोल ननावरे, राहुल पोटे, मंगेश जाधव,समिर पवार, संजय दामोदरे, अमोल पोतदार , अमोल पालखे ,प्रशांत कदम, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Nationalist Youth Congress's Protest against Constitutional Burning