‘नटसम्राट’ नव्या रूपात पुन्हा रंगभूमीवर

गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

पुणे - मराठी नाट्यविश्‍वातील अजरामर कलाकृती, कुणाही अभिनेत्याला सातत्याने प्रेरणा देणारं नाटक म्हणजे नटसम्राट. अनेक दिग्गजांनी आपापल्या अभिनयानं गाजवलेलं हे नाटक पुन्हा मराठी रंगभूमीवर येत आहे. यातील नटसम्राट असेल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी!

कुणी घर देता का घर... या संवादातून एका नटसम्राटाच्या आयुष्याची सायंकाळ दाखवणारी ही कलाकृती. कोणताही नाट्य अभिनेता आपल्याला यातील अप्पासाहेब बेलवलकर रंगविता यावा, यासाठी मनोमन इच्छा ठेऊन असतो. आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी या भूमिकेतून अभिनयाचा आविष्कार मराठी रसिकांसमोर ठेवला आहे.

या नाट्याच्या माध्यमांतरात नाना पाटेकर यांच्या रूपाने मराठी मनाने रुपेरी पडद्यावरही नटसम्राट पाहिला. तरीही पुन्हा पुन्हा पाहावे, असे हे नाटक चार नोव्हेंबर रोजी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. अभिनेते हृषीकेश जोशी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. यात मोहन जोशी हे अप्पासाहेब बेलवलकरांची, तर कसदार अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या रोहिणी हट्टंगडी कावेरीची भूमिका साकारत आहेत. 

निर्माता चंद्रकांत लोहकरे म्हणाले, ‘‘कलाकृती अजरामर असली, तरी त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या नाटकात पूर्वी सेट म्हणून मागे पडद्यावर चित्र काढली जायची. पण नव्या नाटकात रंगमंचावरील नेपथ्यात पाच लोकेशन प्रत्यक्ष दिसतील.’’ 

नटसम्राटमध्ये भूमिका मिळावी, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते, असे सांगत रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, ‘‘माझे स्वप्न आता पूर्ण होत आहे. नाटक जुने असले, तरी प्रत्येक वेळी ते करणारा कलाकार नवीन असतो. तो भूमिकेतून वेगळे बोलू पाहतो, तोच अनुभव आताही प्रेक्षकांना येईल.’’

नटसम्राट हे जुनं नाटक असलं, तरी ते जुनाट नाही. ते पुन्हा पुन्हा करावं वाटतं. कारण ते कालसुसंगत आहे. या नाटकांमध्ये अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र होते. परंतु, नव्या नाटकात अन्य पात्रांनाही तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. नेपथ्यात बदल आहे. 
- हृषीकेश जोशी, दिग्दर्शक

नटसम्राट हे नाटक मी पाहिलेले नाही. त्यामुळे ‘फ्रेश माइंड’ने काम करीत आहे. खूप मोठ्या कलाकारांनी हे नाटक केलेलं आहे. त्यांच्याशी मी तुलना करूही शकणार नाही. पण निर्मात्यांनी एक जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. ती पुरी करण्याचा आनंद मिळेल. 
- मोहन जोशी, अभिनेता

Web Title: Natsamrat will be in new format