निसर्ग, व्यक्तिचित्रांची प्रदर्शनात ‘कलानुभूती’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - संथ तळ्यात एकमेकांवर पाणी उडवत मनसोक्त खेळणारी मुले...पावसात एकाच छत्रीत फिरणारे जोडपे...धुक्‍यात गुरफटलेल्या रस्त्यावरून जाणारी घोडागाडी अशी निसर्गचित्रे, तर कानाला हेडफोन लावून आराम करणारा मॉडर्न गणेश...लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा अशी विविध व्यक्तिचित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. 

निमित्त होते कलानुभूती चित्रप्रदर्शनाचे. इव्हेंट्‌स हाउस एंटरटेन्मेंट आणि ओम इव्हेंट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात देशभरातील शंभर कलाकारांची १५० चित्रे सादर करण्यात आली. प्रदर्शनाचे विशेष म्हणजे नवोदित कलाकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. तैलचित्रे, ॲक्रोलिक्‍स कलर, वॉटर कलर, पेन्सिल, चारकोल अशा विविध प्रकारांमधील चित्रे पाहायला मिळाली. 

मानव आणि प्राणी यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग, प्रेम, आनंद, राग, भय, दु:ख अशा विविध भावनांना दर्शविणारी चित्रे प्रदर्शनात होती. हे प्रदर्शन घोले रस्ता येथील राजा रवी वर्मा कलादालनात रसिकांसाठी आयोजित करण्यात आले होते.

Web Title: Nature, person image exhibition