चाकणला 24 पासून नाट्यमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

चाकण - खेड तालुक्‍यातील नाट्यरसिकांसाठी ‘सकाळ’च्या वतीने २४ ते २६ मे दरम्यान विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन चाकण येथे करण्यात आले आहे. यात मराठीतील गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. म्हणून या नाट्य महोत्सवाची उत्सुकता नाट्यरसिकांना आहे. 

चाकण - खेड तालुक्‍यातील नाट्यरसिकांसाठी ‘सकाळ’च्या वतीने २४ ते २६ मे दरम्यान विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन चाकण येथे करण्यात आले आहे. यात मराठीतील गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. म्हणून या नाट्य महोत्सवाची उत्सुकता नाट्यरसिकांना आहे. 

सारा सिटी, चाकण व सकाळ यांच्या वतीने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांचे हास्याचे फवारे उडविणारे ‘साखर खाल्लेला माणूस’, डॉ. गिरीश ओक व भरत जाधव हे एकत्र असलेले ‘वेलकम जिंदगी’ ही दोन नाटके सादर होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला ‘चैत्रालीचा नादच करायचा नाय’ हा मराठी लावण्यांचा कार्यक्रम होणार आहेत. हा नाट्यमहोत्सव पुणे-नाशिक हायवेवरील पाण्याच्या टाकीजवळील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

महोत्सवातील नाटके व त्यातील कलाकार
 गुरुवार (ता. २४) - साखर खाल्लेला माणूस (प्रशांत दामले, शुभांगी गोखले)
 शुक्रवार (ता. २५) - वेलकम जिंदगी (डॉ. गिरीश ओक, भरत जाधव)
 शनिवार (ता. २६) - चैत्रालीचा नादच करायचा नाय (चैत्रालीराजे)
 कोठे - भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, पुणे-नाशिक हायवे, पाण्याच्या टाकीजवळ
 केव्हा - सायं. साडेसहा वाजता

प्रवेशिका येथे मिळतील
(वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच)
हरिदास कड, श्री ज्ञानेश्वर माउली ॲड्‌, हॉटेल मिलन शेजारी, चाकण बस स्थानकाजवळ, चाकण
(मो. क्र. ९८८१९९१८२२, ९९२२७५९७०५)
विलास काटे, आळंदी (८९८३४०३५८७)
राजेंद्र सांडभोर, राजगुरुनगर (९७६६११९९९९)
एकनाथ सांडभोर, भोरगिरी (९८८१७१८८३४)
वनिता कोरे, पाईट (९२२६९५९७००)
महेंद्र शिंदे, कडूस (७५८८०३३०३३)
राजेंद्र लोथे, चास (९२७००५१९८६)
सदाशिव अमराळे, दावडी (९२२६७१५५३३)
रूपेश बुट्टेपाटील, आंबेठाण (९८५००७०१७४)
अधिक माहितीसाठी संतोष पोटे (९८८१७१८८१७)

Web Title: natyamahotsav in chakan sara city