Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात थांबणार? आता केल्या जाणार 'या' उपाययोजना

Navale bridge accident Update these Measures will be implemented to prevent accidents near Navale bridge
Navale bridge accident Update these Measures will be implemented to prevent accidents near Navale bridge Esakal

पुणे : पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ टँकरच्या धडकेने अनेक वाहानांचे नुकसान झाल्याचा प्रकरा काल घडला. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या अपघातानंतर पोलीस आयुक्त, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यासह NHAI चे अधिकारी यांची आज बैठक पार पडली यामध्ये काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Navale Bridge Accident)

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ अपघात झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना कंटेनरने अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात १३ जण जखमी झाले असून या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Navale bridge accident Update these Measures will be implemented to prevent accidents near Navale bridge
Eknath Khadse News: मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचा खडसेंच्या वर्मावर घाव

अपघातामागचं कारण काय ?

हा अपघात ब्रेक फेल झाल्याने घडल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता याबाबत स्पष्टता झालेली असून उतारावर गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उतारावर इंजिन बंद करुन ड्रायव्हरने गाडी चालवली. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही. ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे १३ जण जखमी झालेत तर २४ वाहनांचं नुकसान झालंय.

Navale bridge accident Update these Measures will be implemented to prevent accidents near Navale bridge
Nitin Gadkari: कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमच्या आई-वडिलांपेक्षा…"

नवीन उपाययोजना काय असणार?

  • मुख्य उतार कमी करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरीपुल मधील तीव्र वळण कमी करणे.

  • विविध ठिकाणी रम्बलर स्ट्रीप्स व रिफ्लेक्टर बसविणे.

  • जड वाहनांची स्पीड लिमीट टप्याटप्याने कमी करणे.

  • सर्व्हिस रस्ता रुंद करणे, दुरुस्ती करणे, तसेच तेथील अतिक्रमणे काढणे.

  • नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात घोषणा करण्याकरिता ऑडीओ सिस्टीम बसविणे.

  • जड वाहनांची स्पिड लिमीट ४० करणे.

  • रम्बलर स्ट्रीप दर ३००-४०० मीटरच्या अंतरावर करणे. तसेच प्रत्येक दोन महिन्यांनी त्यांची डागडुजी व देखभाल करणे.

  • स्पिड गन व कॅमेरे बोगद्यापासून थोड्या-थोड्या अंतरावर २ ते ३ ठिकाणी बसविणे.

  • नऱ्हे सर्व्हिस रोड व महामार्गाला मिळणा-या सर्व छोट्या रस्त्यांवर रम्बलर स्ट्रिप बसविणे.

  • स्ट्रिट लाईट संख्या वाढविणे.

  • नागरिक महामार्गावर येणार नाहीत, या दृष्टीने नन्हे सेल्फी पॉईंट हटविणे, तेथील पाय-या तोडणे.

  • पुल सुरु होताना व पुलावर विविध ठिकाणी ब्लिंकर बसविणे.

  • महामार्गावर लावण्यात आलेले विविध प्रकारचे साईन बोर्डस् हे रस्त्याचे डावे बाजूला असून वाहनचालकांना ते स्पष्ट दिसावेत याकरीता ते रस्त्याचे मध्यभागी दर्शनी भागावर लावणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com