विघ्नहर साखर कारखान्याचे तज्ञ संचालकपदी नवले

दत्ता म्हसकर
रविवार, 29 एप्रिल 2018

नवले हे कारखान्याच्या स्थापनेपासूनचे सभासद असून भाग भांडवल उभारणीत संस्थापक अध्यक्ष निवृत्तीशेठ शेरकर यांना मोलाचे सहकार्य केले होते.

जुन्नर - येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे शासन नियुक्त तज्ञ संचालक पदी येणेरे ता. जुन्नर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उल्हास नामदेव नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत त्याचा सत्कार करण्यात येऊन त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

नवले हे कारखान्याच्या स्थापनेपासूनचे सभासद असून भाग भांडवल उभारणीत संस्थापक अध्यक्ष निवृत्तीशेठ शेरकर यांना मोलाचे सहकार्य केले होते.
यावेळी नवले म्हणाले, कारखान्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे. माझी कारखान्याच्या कामकाजात नेहमी सहकार्याची भूमिका राहिल. नियुक्ती बद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Navale as the expert director of the Vignerhar sugar factory

टॅग्स