नवस, प्रसाद, अभिषेक झाले ऑनलाइन ! 

अभिषेक मुठाळ
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : नवस बोलायचा असल्यास त्याचा मेसेज आता एनक्रिप्टेड पद्धतीने देवासमोर करू शकणार आहात. तसेच लाइव्ह दर्शन, प्रसाद आणि अभिषेक यासाठीही तुम्ही बुकिंग करू शकता. 'भक्ती ऍप' वर या सगळ्या सुविधा आता आपल्याला श्री साईबाबा संस्थान प्रतिशिर्डी शिरगावसाठी मिळणार आहेत. 

श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डी शिरगाव आणि शेमारू एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिशिर्डी शिरगाव देवस्थान येथून मोबाईलवर लाइव्ह दर्शन आणि अन्य ऑनलाइन सेवेचे अनावरण करण्यात आले.  श्रद्धेची मानवतेला गरज असून माणूस आहे तो पर्यंत देव आहे. माझी देवावर श्रद्धा असून अंधश्रद्धेला माझा पण विरोध आहे. आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधला तारतम्य ओळखायला पाहिजे, असा सल्ला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. 

यावेळी शेमारू भक्ती ऍपचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी प्रमुख विश्‍वस्त प्रकाश देवळे, विश्‍वस्त सचिव सपना लालचंदानी, शेमारूचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गाडा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रसन्न पाटील, विश्‍वस्त रवी जाधव, उमेश कवीटकर, विभावरी जाधव, डिंपल लालचंदानी, प्रतिभा कारंजकर, समीर शेख आदी उपस्थित होते. 

भक्ती ऍपची ठळक वैशिष्टे 
- मनोकामना सर्व्हिस - ज्यात देवासमोर तुमचा नवस एनक्रिप्टेड पद्धतीने      मेसेज ऐकवला जाणार 
- लाइव्ह दर्शन 
- प्रसाद आणि अभिषेक करण्यासाठी बुकिंग करू शकता. 
- देणगी देऊ शकता 
 
Web Title: navas prasad abhishek zale online