#Navdurga उत्सव आदिशक्तीचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पिंपरी - आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला बुधवारी (ता. १०) घटस्थापनेद्वारे सुरवात होणार आहे. विविध मंडळ व संस्थांनी देवीला आकर्षक सजावट केली आहे. तसेच काही मंडळांनी मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती केल्या आहेत.

पिंपरी - आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला बुधवारी (ता. १०) घटस्थापनेद्वारे सुरवात होणार आहे. विविध मंडळ व संस्थांनी देवीला आकर्षक सजावट केली आहे. तसेच काही मंडळांनी मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती केल्या आहेत.

घटस्थापनेसाठी लागणारे हळद, कुंकू, धूप, कापूर, अगरबत्ती आदी पूजा साहित्य तसेच लाल कापड, चुनरी, वस्त्रमाळ, पाच फळे, घट, धान्य, परडी, पत्रावळी, विड्याची पाने, नाडा पुडी, बांगडी, गुलाबपाणी, नारळ, मातीची खरेदी करण्यासाठी बाजारात मंगळवारी गर्दी होती. पूजा साहित्य १० रुपयांच्या छोट्या पुड्यांमध्ये उपलब्ध होते.  तसेच दांडियासाठी लागणाऱ्या लाकडी दांडिया आकर्षक कलाकुसरीमध्ये विक्रीस होत्या. बालचमू, महिला आणि तरुण-तरुणीकडून त्याची खरेदी केली जात होती. 
 
देवीला आकर्षक सजावट 
चिंचवड नवरात्र महोत्सवांतर्गत चापेकर चौकाजवळ अयोध्या येथील नियोजित राम मंदिराची प्रतिकृती बनविली आहे. येथील विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी केले आहे. फायबरच्या पिलरचा वापर करून ४० बाय ६० फूट रुंद आणि ६१ फूट उंचीचे हे मंदिर बनविले आहे. मंदिरात प्रथमदर्शनी भगवान श्रीरामाची मूर्ती लक्ष वेधून घेते. व्यासपीठावर साडेतीन शक्तिपीठ आणि स्वामी समर्थ पादुका दर्शनाची सोय केली आहे. शाहूनगर येथे सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणात कोलकत्याहून आलेल्या कलाकारांनी बासंती मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. राजर्षी शाहू मित्र मंडळ व गंगाराम चांदगुडे प्रतिष्ठानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Web Title: Navdurga Navratrotsav