#NavDurga ‘उदो उदो’चा जयघोष (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पिंपरी - मंदिरांमध्ये आणि घरोघरी विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला शहरात बुधवारी (ता. १०) सुरवात झाली. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट केलेली होती.

पिंपरी - मंदिरांमध्ये आणि घरोघरी विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला शहरात बुधवारी (ता. १०) सुरवात झाली. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट केलेली होती.

निगडी-प्राधिकरण येथील दुर्गादेवी टेकडी येथील दुर्गादेवी माता मंदिरात भाविकांच्या हस्ते, आकुर्डी येथील तुळजाभवानी माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्रिपुरभैरवी या रूपात देवीची पूजा मांडण्यात आली होती. पिंपरी येथील माता वैष्णोदेवी मंदिरात विश्‍वस्त अशोक दखनेचा यांच्या हस्ते घटस्थापना झाली. तानाजीनगर येथील कालिका माता मंदिरात संजय गावडे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. शैलपुत्री रूपात देवीची पूजा मांडली थेरगाव-कैलासनगर माता मोहटादेवी मंदिरात कलावती पारख यांच्या हस्ते घटस्थापना झाली. चिंचवडगाव, चापेकर चौकाजवळ आयोजित चिंचवड नवरात्र महोत्सवांतर्गत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज, हेमंत हरहरे, वा. ना. अभ्यंकर यांच्या हस्ते घटस्थापना झाली. सुपर्ब युथ सर्कलच्या वतीने पिंपरी येथील शगुन चौकात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व गोवर्धन मंगतानी यांच्या हस्ते घटस्थापना झाली.

Web Title: NavDurga Navratrotsav Tuljabhavani Mata Temple Akurdi