सिंहगडाच्या डोंगरदऱ्यांत आणली विकासाची गंगा

अगोदर काँग्रेसमध्ये असताना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरदचंद्र पवार साहेबांचे ते खंदे समर्थक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते.
Navnath and Pujatai Parage
Navnath and Pujatai ParageSakal

- श्री. नवनाथ रोहिदास पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य

- सौ. पूजाताई नवनाथ पारगे, जिल्हा परिषद सदस्य, सभापती - महिला बालकल्याण

वडील रोहिदास पारगे हे १९९५ ते २००५ सालापर्यंत डोणजे गावचे सरपंच होते. अगोदर काँग्रेसमध्ये असताना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरदचंद्र पवार साहेबांचे ते खंदे समर्थक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. रोहिदास पारगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पश्चिम हवेली विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम सुरू केले. या पदावर काम करताना पारगे यांनी मोठा तरुणवर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळवला. डोणजे गावातील चौदा गणपती मंडळे एकत्र करून तरुणांच्या एकजुटीने गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. नवनाथ पारगे २०१० मध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आले व त्याच दरम्यान उपसरपंच म्हणून निवड झाली. जनसंपर्क व युवा चेहरा पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१२ मध्ये खेड-खानापूर या जिल्हा परिषद गटातून उमेदवारी संधी दिली आणि नवनाथ पारगे मोठ्या मताधिक्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सिंहगड परिसरातील डोंगर-दऱ्यांतील गावांमध्ये विकासाची मोठी कामे पारगे यांनी केली. २०१७ मध्ये सदर जिल्हा परिषद गटातून महिला आरक्षण पडल्यानंतर नवनाथ पारगे यांच्या पत्नी सौ. पूजाताई पारगे यांनी नेतृत्व हाती घेतले. सध्या पूजा पारगे पुणे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.

जाणता राजा : शरदचंद्र पवार साहेब

माझे वडील रोहिदास पारगे हे पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दलची बालपणापासून रुजलेली आत्मीयता कधीही कमी झाली नाही. पवार साहेबांनीही ग्रामीण नेतृत्व म्हणून आमच्याकडे कधी दुर्लक्ष केले नाही. पवार साहेबांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने सिंहगड किल्ला परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड बनला आहे. गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.

खंबीर साथ अजितदादांची

राजकारणात पदार्पण केल्यापासूनच आदरणीय अजितदादा पवार यांनी खंबीर साथ दिली आहे. लढण्याची प्रेरणा अजितदादा देत राहतात. विकासकामे करत असताना अजितदादांचे मार्गदर्शन सतत मिळत आहे. अजितदादांची कार्यशैली ही माझ्यासारख्या राजकीय क्षेत्रात काम असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी चालते बोलते विद्यापीठ आहे.

‘ताई’ आपली हक्काची

ज्या जिल्हा परिषद गटात मी प्रतिनिधित्व करत आहे, तो गट बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने प्रत्येक विकासकामावर ताईंचे बारीक लक्ष असते. गटातील अनेक मोठे प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत. ताईंचे प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर तयार झालेले आपुलकीचे नाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भागातील वाढीचे प्रमुख कारण आहे. ताईंची हक्काची साथ असल्याने राजकीय कारकीर्द सुरू केल्यापासून आजपर्यंत व येथून पुढेही विकासगंगा अशीच अविरत सुरू राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली काही ठळक विकास कामे

  • कोंढणपूर येथील तीर्थक्षेत्र तुकाईमाता मंदिरासमोर पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला भव्य अश्वारूढ पुतळा उभा केला.

  • कोंढणपूर तीर्थक्षेत्र ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, त्यामुळे विकासनिधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला.

  • कोंढणपूर ते कल्याण, कोंढणपूर ते रहाटवडे, डोणजे ते आतकरवाडी, पानशेत रस्ता ते आंबी, तसेच गटातील प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते करण्यात आले.

  • शेतकऱ्यांना कडबा-कुट्टी यंत्र, फवारणी पंप, कृषी पंप, विविध आधुनिक अवजारे, दुभती गाय, मिल्किंग मशिन, बैलजोडी व इतर योजनांचा लाभ मिळवून दिला.

  • महिला सशक्तीकरण मोहिमेअंतर्गत बचत गटांना अर्थसाहाय्य, पीठ गिरणी, शिलाई मशिन उपलब्ध करून दिले, तसेच महिलांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण शिबिर व जनजागृती शिबिरांचे आयोजन केले.

  • आंबी येथे पश्चिम हवेलीतील सर्वांत सुसज्ज १ कोटी ६८ लाख रुपये निधीतून आरोग्य उपकेंद्र उभारले.

  • मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. स्वत: नवनाथ पारगे यांनी ११ वेळा रक्तदान केले आहे.

  • प्राथमिक शिक्षण सुलभ होण्यासाठी डोणजे, श्रीरामनगर, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, वरदाडे, आंबी, खामगाव मावळ, कल्याण, कोंढणपूर, आर्वी, खेड, शिवापूर, गाऊडदरा या गावांमध्ये प्रशस्त वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले.

  • अंगणवाड्यांसाठी खेळणी, गरोदर महिलांना बालसंगोपन साहित्य, पोषक आहार यांचे वाटप करण्यात आले, तसेच गोऱ्हे बुद्रक, डोणजे, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, खामगाव मावळ, मालखेड, वरदाडे, सोनापूर, आंबी, गोगलवाडी, गाऊडदरा, खेड, श्रीरामनगर, शिवापूर, आर्वी, कोंढणपूर, रहाटवडे, घेरासिंहगड, कल्याण, मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळेवाडी, सांगरूण, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, जांभली, तसेच मतदारसंघातील वाड्या-वस्त्यांवर अंगणवाडीसाठी इमारतींचे बांधकाम केले.

  • सिंहगड किल्ला विकासासाठी पाठपुरावा केला. सिंहगडावर सभामंडप व विश्रामगृह उभारण्यात आले.

  • ‘हवेली तालुका केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये तालुक्यातील चारशे मल्लांनी सहभाग घेतला. विजेत्या मल्लास पन्नास हजार रुपये रोख व चांदीची गदा आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आली.

अजून खूप काही करायचे आहे...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. पर्यटनाला या भागात मोठी संधी आहे, त्यातून रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प हाती घेणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. डोंगरकपारीत वास्तव्य करत असलेल्या आदिवासी कातकरी समाजाला ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणार आहे. भव्य क्रीडासंकुल व प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com