उद्या पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होणार पिंपळ्याचे ५४१ नवोदय विद्यार्थी

प्रतिभाशाली विद्यार्थी उद्या कार्यक्रमात सहभागी होणार
छायाचित्र : संग्रहीत
छायाचित्र : संग्रहीतsakal

शिक्रापूर : इयत्ता दहावी व बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिंपळे-जगताप (ता.शिरूर) येथील नवोदय विद्यालयासह देशातील सर्व नवोदय व केंद्रीय विद्यालयांतील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम उद्या (१ एप्रिल) रोजी आयोजित केल्याची माहिती प्राचार्य बी.आर.खेडकर यांनी दिली. आमचे ५४१ विद्यार्थी व ४० शिक्षक या संवादासाठी पूर्ण तयारीने उतरल्याची माहितीही प्राचार्य खेडकर यांनी दिली.

नवोदय विद्यालयांसह देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये सीबीएसई बोर्डाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. यावर्षी साधारण २६ एप्रिल ते २१ मेच्या दरम्यान या परीक्षा होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व परीक्षार्थींशी संवाद साधणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले होते व विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांचीही तयारी करुन ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पिंपळे-जगताप येथील दहावी-बारावीसह ५४१ विद्यार्थी,देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेले दक्षणा फाउंडेशनचे ५४ विद्यार्थी, पुणे जिल्ह्यातून आलेले ४७९ प्रतिभाशाली विद्यार्थी उद्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती प्राचार्य खेडकर यांनी दिली.

देशात सध्या १५०० केंद्रीय विद्यालये आहेत तर ६६१ नवोदय केंद्र सरकारच्या माणव संसाधन विभागाकडून चालविली जातात. केंद्रीय विद्यालयात प्रती विद्यालय १००० तर प्रती नवोदय विद्यालय साधारण ५५० विद्यार्थी शिकत आहेत. या सर्वांना उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुले व मुली अशा दोन विभागात स्वतंत्र एलसीडी स्क्रीनवर परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सकाळी १० ते ११.३० या दरम्यान होणार असल्याचेही प्राचार्य खेडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com