२१ वर्षाच्या सुनेबरोबर ६५ वर्षाच्या सासऱ्याने केले लग्न, कारण...

bt.jpg
bt.jpg

पुणे : मुलाचे लग्न जमले. सर्व तयारी पण झाली. लग्नघरचे सर्वजण मंडपात आले अन् नवरा मुलगा लग्न मंडपातून फरार झाला. कारण त्याचे पुण्यातील एका मुलीशी प्रेमसंबध होते. आता मुलीच्या आणि मुलाच्या घरच्यांची बदनामी झाली, मग काय मुलीच्या घरच्यांनी मुलांच्या 65 वर्षाच्या वडिलांशी म्हणजे होणाऱ्या सासऱ्याशी मुलीचा विवाह लावून दिला. ही घटना घडली आहे बिहारमधल्या एका गावात. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये या घडलेल्या घटनेमधील सासऱ्याचे वय 65 वर्षे आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या सुनेसह लग्न केले आहे. ती 21 वर्षांची आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तिच्या सासूनेही तिच्या सासऱ्यास सुनेशी लग्न करण्यास नकार दिला नाही. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील 65 वर्षीय रोशन लाल असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

या लग्नाविषयी ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. आणि प्रश्न विचारू लागला आहे. सासरच्यांनी हे पाऊल उचलण्याचे कारण काय होते? रोशन लाल यांना विचारले असता ते म्हणाले, ''मुलीच्या घरच्यांनी सक्ती केल्यामुळे लग्न करावे लागले. मुलगा लग्न मंडपातून फरार झाला, यामुळे मुलीच्या घरच्याची बदनामी झाली. यामुळे त्यांनी मला मुलीशी लग्न करण्य़ास भाग पाडले.'' 

वास्तविक रोशनलालच्या मुलाचे लग्न सपना नावाच्या मुलीशी ठरविण्यात आले होते. मिरवणूक मुलीच्या दाराजवळ पोहचली, पण रोशन लाल यांचा मुलगा मंडपातून फरार झाला, कारण त्याचे पुण्यातील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्याला त्या मुलीशीच लग्न करावयाचे होते. रोशन लाल यांच्या भीतीने तो लग्नासाठी तयार झाला पण लग्नाच्या मंडपातून शेवटी तो फरार झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशाप्रकारे, अचानक वराच्या पळून जाण्याने दोन्ही कुटुंबांची बदनामी झाल्याने, शेवटी रोशन लाल यांनी घराचा सन्मान वाचविण्यासाठी मुलीच्या घरच्यांचे ऐकून सपनासमवेत सात फेऱ्या घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com