कुरकुंभ येथील फिरंगाई देवीचा नवरात्र उत्सव रद्द

सावता नवले
Friday, 16 October 2020

आदिशक्तीच्या साडेतीन पिठानंतर येणाऱ्या ऐकावन्न पिठात समावेश असलेल्या कुरकुंभ (ता. दौड) येथील फिरंगाई देवीचा नवरात्र उत्सव कोरोना संसर्गाचा धोका लक्षात रद्द  करण्यात आला आहे.

कुरकुंभ : आदिशक्तीच्या साडेतीन पिठानंतर येणाऱ्या ऐकावन्न पिठात समावेश असलेल्या कुरकुंभ (ता. दौड) येथील फिरंगाई देवीचा नवरात्र उत्सव कोरोना संसर्गाचा धोका लक्षात रद्द  करण्यात आला असून, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल कुलकर्णी यांनी दिली.

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

नवरात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत असून कुरकुंभ येथील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक गर्दी करतात. हा उत्सव घटस्थापनेपासून नऊ दिवस व त्यानंतर येणार्या पोर्णिमेपर्य॔त चालू असतो.

त्यामुळे नवरात्रातील पाचवी, सातव्या माळेला दर्शनासाठी गर्दी होते. हा गर्दीचा व कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास्ठी यंदा नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, या कालावधीत देवीचे मंदिर दर्शनासाठी शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन फिरंगाई देवी देवस्थान विश्वसस्थांकडून करण्यात येत आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Navratra festival of Firangai Devi at Kurkumbh has been canceled

Tags
टॉपिकस
Topic Tags: