Navratri Festival 2019 : ‘उदे गं अंबे उदे’चे बक्षीस वितरण

ऑटोक्‍लस्टर, चिंचवड - ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘उदे गं अंबे उदे’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांसमवेत सुजाता बर्वे, नितीन कुंजीर, सिद्धार्थ मुळे व प्रवीण किरंगे.
ऑटोक्‍लस्टर, चिंचवड - ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘उदे गं अंबे उदे’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांसमवेत सुजाता बर्वे, नितीन कुंजीर, सिद्धार्थ मुळे व प्रवीण किरंगे.

पिंपरी - नवरात्रोत्सवामध्ये हाती मिळणारे महालक्ष्मीचे चांदीचे नाणे, चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव, छायाचित्र घेताना होणारा मोबाईल कॅमेऱ्यांचा लखलखाट आणि टाळ्यांचा कडकडाट... अशा वातावरणात ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी (ता. ६) चिंचवडच्या ऑटोक्‍लस्टर सभागृहात झाले.

नवत्रोत्सवानिमित्ताने ‘सकाळ माध्यम समूहा’ने मंगळवारी (ता. १) ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रकाशित केली होती. त्यातील लेखांवर आधारित प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना दिली. त्यास वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. याचा निकाल शनिवारी (ता. ५) ड्रॉपद्धतीने काढला होता. त्याचे बक्षीस वितरण लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पिंपरी-चिंचवड शाखा व्यवस्थापक सुजाता बर्वे, एन. के. फर्निशिंगचे संचालक नितीन कुंजीर, सुरेश वास्तूचे संचालक सिद्धार्थ मुळे, लव्हस्प्रिंग वंडर नेस्टचे सहकारी प्रवीण किरंगे आणि ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर यांच्या हस्ते झाले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. महालक्ष्मीचे चांदीचे नाणे भेट देऊन विजेत्यांचा गौरव केला. श्रावण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. 

विजेते म्हणाले...
राजनंदिनी सेठिया - ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणीमुळे देवीविषयीची सविस्तर माहिती वाचायला मिळाली. केवळ धार्मिक किंवा पौराणिकच नव्हे, तर सामान्य ज्ञानातही भर पडली. प्रश्‍नांची उत्तरे शोधताना पुनःपुन्हा पुरवणी वाचल्यामुळे मेंदूला चालना मिळाली.

योगिता फुलसागर - यापूर्वी पाठ्यपुस्तकात व सामान्य ज्ञान पुस्तकांमध्ये देवीविषयी वाचलेली थोडीफार माहिती होती. मात्र, ‘सकाळ’च्या पुरवणीमुळे अभ्यासाव्यतिरिक्त माहिती मिळाली. देवीची ठिकाणे, नावे, रूपे अशा अनेक गोष्टी लक्षात राहिल्या.

मंगल नहार - अभ्यासपूर्ण माहिती पुरवणीत वाचायला मिळाली. त्यातील काही गोष्टी, संदर्भ एक आजी म्हणून नातवंडांना सांगता येतील. स्पर्धेच्या निमित्ताने पुरवणी वाचून झाली. मात्र, प्रश्‍नमंजूषा सोडविताना नातवंडांनाही वाचून दाखवली. त्यातून त्यांच्यावर चांगला संस्कार करता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com