स्वातंत्र्यवीर सावरकर चौक (सारस बागेजवळ) - शारदीय नवरात्रोत्सव आश्‍विन शुद्ध प्रतिपदा अर्थात बुधवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. या निमित्ताने महालक्ष्मी मंदिरात जगत्‌कल्याणक महालक्ष्मीमाता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, गाभाऱ्यातील फलकांवर १००८ द
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक (सारस बागेजवळ) - शारदीय नवरात्रोत्सव आश्‍विन शुद्ध प्रतिपदा अर्थात बुधवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. या निमित्ताने महालक्ष्मी मंदिरात जगत्‌कल्याणक महालक्ष्मीमाता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, गाभाऱ्यातील फलकांवर १००८ द

उदे गं अंबे उदे...

पुणे - घटाला वावरी (काळी माती), रेशमी वस्त्रे, कापसाची माळावस्त्र, घट (सुगडे), नाडा (सुतीदोरा), खण-नारळ, ओटीचे साहित्य, भरजरी वस्त्रे, चुनरी, मंडपी, रांगोळी, नानाविध रंग, फळांचे वाटे यांसह पूजासाहित्यांनी नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठ सजली आहे. वंशपरंपरेनुसार कुलदैवत असलेल्या घरच्या देवीच्या तांदळ्याला चांदीचा मुखवटा, चौरंग, छत्री, मुगुट यांसह विविध आभूषणांचे बुकिंग सराफी पेढ्यांवर सुरू आहे. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  

शारदीय नवरात्रोत्सवास आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला (ता.१०) सुरुवात होत आहे. घटस्थापना करून विजयादशमीला (दसरा) देवीचा छबिना काढणे. कोजागरी पौर्णिमेला जागर करणे, उत्सवानिमित्त मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या तयारीत कार्यकर्ते व्यग्र होते.

सार्वजनिक मंडळे, सोसायट्या, संस्था, महिला मंडळांतर्फे गरबा, दांडिया, महिलांचे भजन यांसारख्या कार्यक्रमांची आखणी सुरू आहे. 

महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर पूजासाहित्यांनी गजबजला आहे. कापड बाजारातही देवीच्या साड्या, ओटीचे खण आले आहेत. सराफी बाजारपेठेतही कारागिरांतर्फे देवीच्या मंदिरांतील चांदीच्या महिरप, चौरंग, मुगुट, तसेच दागदागिन्यांवर पॉलिश करण्याचे काम सुरू आहे. खास घडणावळीतले दागिने करून घेण्याकडेही नागरिकांचा कल सराफी पेढ्यांवर दिसून येत आहे. शहर व उपनगरांतही पथारी व्यावसायिकांनी पूजेसहित नानाविध वस्तूंच्या पथाऱ्या मांडल्या आहेत. 

विक्रेत्या अमिना शिकीलकर म्हणाल्या, ‘‘पूजासाहित्य विक्रीत आमची तिसरी पिढी आहे. बाराही महिने आम्ही हाच व्यवसाय करतो. या निमित्ताने देवाधर्माच्या कार्यात आमचीही सेवा कळत-नकळत रुजू होते. घट स्थापनेकरिता काळी माती लागते. मात्र, शहरात माती मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. त्यामुळे खानापूर, मांजरी, हडपसर येथून वावरी (काळी माती) आणतो. नऊ प्रकारचे धान्य, मंडपीसारखे अनेक बारीक सारीक जिन्नस नागरिक खरेदी करतात. त्यामुळे प्रत्येक उत्सवाच्या महिनाभर अगोदर आम्ही तयारीला लागतो.’’

विक्रेते सतीश भंडारी म्हणाले, ‘‘कुंकवाचा करंडा, फणी, हिरव्या बांगड्या (चुडा), सुपारी, हळद-कुंकू, बदाम, खारीक, गुलाल, बुक्का, दोऱ्याचे बंडल, देवीच्या मूर्तीसाठी लाल रंगाची चुनरी यांसारखे साहित्य बाजारपेठेत आले आहे. घरोघरी घट बसविण्याकरिता नागरिक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, मंदिरांचे व्यवस्थापन आवर्जून साहित्य खरेदी करतात.’’ 

दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत करा घटस्थापना 
आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला (ता.१०) ब्राह्म मुहुर्तापासून (पहाटे पाच) दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल. यंदा घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आला आहे. साधारणतः प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत नऊ किंवा दहा दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयामुळे असा फरक पडतो. या वर्षी (ता.१८) रोजी दसरा आहे. ललिता पंचमी (ता. १३) आहे. महालक्ष्मी पूजन करणे म्हणजे घागरी फुंकणे होय. ता.१६ रोजीची अष्टमी घागरी फुंकण्याची आहे. ता. १७ रोजीची दुर्गाष्टमी उपवासाची आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

घटस्थापना मुहूर्त दुपारी १.३६ पर्यंत 
आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला (ता.१०) ब्राह्म मुहूर्तापासून (पहाटे पाच) दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल. यंदा घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. ललिता पंचमी ता. १३ रोजी  आहे.

महालक्ष्मीपूजन करणे म्हणजे घागरी फुंकणे होय. ता.१६ रोजीची अष्टमी घागरी फुंकण्याची आहे. ता. १७ रोजीची दुर्गाष्टमी उपवासाची आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com