नवरात्रोत्सवाची शहरभर धामधूम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पुणे - सांस्कृतिक कार्यक्रमांसहित सामाजिक उपक्रम राबवीत शहर व उपनगरांत नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर करण्यात येत आहे. 
ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मंदिर, काळी व पिवळी जोगेश्‍वरी मंदिर (बुधवार पेठ), भवानी माता मंदिर (भवानी पेठ) यांसह तळजाई माता मंदिर (पाचगाव पर्वती), संतोषी माता मंदिर (कात्रज), श्री देवी चतुःशृंगी मंदिर (चतुःशृंगी टेकडी), पद्मावती देवी मंदिर (पद्मावती), वनदेवी मंदिर (कर्वेनगर) यांसह विविध समाजांच्या देवीच्या मंदिरांत पहिल्या माळेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. 

गजरा, खण, नारळ, भरजरी साड्यांची दुकानेदेखील मंदिर परिसरात सजली आहेत. महिलांच्या भजनी मंडळांतर्फे अनेक मंदिरांमध्ये देवीची गाणी गायली जात आहे. सार्वजनिक मंडळांनी गरबा, भोंडला व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले आहेत. बंगाली समाजातर्फेही दुर्गोत्सवाची तयारी सुरू आहे. आश्‍विन शुद्ध षष्ठीला दुर्गोत्सवाला बंगाली समाज सुरवात होईल.

भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या साड्यांचे दसऱ्याला महिलांना मोफत वाटप करतो. उत्सवात दररोज येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद असतो. अध्यक्ष सुनील शहा यांच्या मार्गदर्शनात मंदिराचे व्यवस्थापन चालते. 
- गिरीश शहा, विश्‍वस्त संतोषी माता मंदिर (कात्रज) 

आश्‍विन शुद्ध षष्ठीला (ता. १५) दुर्गोत्सवास सायंकाळी सुरवात होईल. सप्तमी, अष्टमी, नवमीला विविध कार्यक्रम आयोजिले आहेत. प्रथेप्रमाणे कुमारिका पूजन होईल. दसऱ्याला ढोलताशाच्या गजरात देवीची मिरवणूक निघेल. 
- अनुप दत्ता, सरचिटणीस, कालीबाडी मंदिर, खडकी.

Web Title: Navratrotsav Pune