नायगावच्या सरपंचपदी प्रज्ञा साखरेंची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

उरुळी कांचन - नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रज्ञा ज्ञानेश्वर साखरे तर उपसरपंचपदी कल्पना गंगाराम चौधरी यांची निवड झाली.

दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणाने तत्कालीन सरपंच मीरा शेलार व तिसरे आपत्य असल्याच्या कारणावरून वार्ड क्र. १ मधील मनिषा माने यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. रद्द झालेल्या या दोन्ही जागांसाठी २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक घेण्यात आली होती. सरपंच पदाच्या जागेवर प्रज्ञा साखरे तर वार्ड १ मधून छाया नाना गायकवाड यांनी विजय मिळविला.

सरपंच व उपसरपंच पदासाठी सोमवारी (ता. ९) ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. त्या जागी प्रज्ञा साखरे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपसरपंच पदासाठी कल्पना रामचंद्र पवार व कल्पना गंगाराम चौधरी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये कल्पना पवार व कल्पना चौधरी यांनी अनुक्रमे ४ व ५ मते मिळाल्याने उपसरपंच पदावर कल्पना चौधरी यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर शिंगोटे यांनी केली. यावेळी चिंतामणी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच विकास चौधरी यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार केला.

यावेळी सोरतापवाडीचे माजी सरपंच तथा पॅनेल प्रमुख सागर चौधरी, विजय चौधरी, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी, माजी उपसरपंच गणेश चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब माने, छाया गायकवाड, सुनिता गायकवाड उपस्थित होत्या.
 
Web Title: naygaon sarpancha pradnya sakhre