नाझिरकर यांच्या पत्नीचा अर्ज फेटाळला;दागिने परत करण्यास न्यायालयाचा नकार

नाझिरकर यांच्या पत्नीचा अर्ज फेटाळला;दागिने परत करण्यास न्यायालयाचा नकार

पुणे - अमरावती नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझिरकर यांच्या पत्नी संगीता नाझिरकर यांनी त्यांचे दागिने परत मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. 

जप्त केलेले दागिने हे खरेदी करण्यात आलेले आहे. तसेच ते स्त्रीधन असल्याचा पुरावा सादर न केल्याने हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने या आदेशात नमूद केले. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हनुमंत नाझिरकर (वय 53) यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता नाझिरकर, मुलगा भास्कर नाझिरकर व मुलगी गीतांजली नाझिरकर (रा. स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी, कोथरूड) अशा चौघांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात उत्पन्नापेक्षा दोन कोटी 75 लाख रुपयांची जादा रक्कम व मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. नाझिरकर यांनी केलेल्या अर्जास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. 

नाझिरकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाअंती स्पष्ट केले. संगीता नाझिरकर यांच्या वैवाहिक जीवनापुर्वीची पार्श्वभूमी पाहता त्यांना वडिलांकडून लग्नाच्या वेळी एवढ्या किमतीचे व वजनाचे दागिने स्त्री धन म्हणून दिले हे संशयास्पद असून याबाबत तपास सुरू असल्याचे ऍड. अगरवाल यांनी न्यायालयास सांगितले. दागिन्यांत 945 ग्रॅम सोने, तर 12 हजार 365 ग्रॅम चांदीचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com