राष्ट्रवादीकडून 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार - दानवे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

शिवणे - ""राष्ट्रवादी कॉंग्रेसने 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सिंचनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांचे पैसेदेखील दिले नाहीत,'' असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. 

शिवणे, कोंढवे-धावडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार ममता सचिन दांगट, शिवणे पंचायत समिती गणातील उमेदवार उषा सुभाष नाणेकर व कोंढवे-धावडे गणातील उमेश सरपाटील यांच्या प्रचारार्थ निर्धार सभा उत्तमनगर येथे आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. 

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे समर्थक आगळंबे गावचे माजी सरपंच नितीन पायगुडे, त्यांच्या पत्नी व ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पायगुडे, उत्तमनगरच्या माजी सरपंच सुमन पंडित, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण दांगट, तालुकाध्यक्ष बापू दांगट व त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दानवेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

नोटांबदीमुळे, जमा झालेल्या पैशामुळे शेतकऱ्यांच्या कर्जावरील 2 महिने व्याज रद्द केले. यापुढे गरोदर महिलांना सहा हजार रुपये तिच्या खात्यावर जमा केले जाणार आहे, असे असून दानवे म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा आम्हाला जास्त जागा मिळाल्याने ते आमच्या नावाने शिव्या देत आहेत. प्रत्यक्षात तुम्ही आम्हाला मतदान केल्यामुळे या शिव्या मतदारांना दिल्या जात आहेत.''

Web Title: NCP 70 thousand crore corruption