Video : गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

पडळकर यांनी पंढरपूरमध्ये पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले मंडईत लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास आंदोलन केले.

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी त्यांचा निषेध केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पडळकर यांनी पंढरपूरमध्ये पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले मंडईत लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास आंदोलन केले. भाजप मुर्दाबादच्याही घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. पक्षाचे जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, राजलक्ष्मी भोसले, बाबुराव चांदेरे,  प्रदीप देशमुख, शशिकला कुंभार आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला. होम क्वारंटाईन असल्यामुळे शहराध्यक्ष चेतन तुपे आंदोलनस्थळी नव्हते.

पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य

Image may contain: 2 people, people standing

या वेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेधांच्या घोषणांच्या निनादात तो जाळला. या प्रसंगी भाजपची राजकीय संस्कृती काय आहे, ते पक्षाने पडळकर यांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. पडळकर हे प्यादे असून त्याचा बोलवता धनी भाजपच आहे. शरद पवार यांची उंचीही भाजपच्या नेत्यांना माहिती नाही. त्यामुळे ते असे उद्योग करीत आहेत. यातून भाजपच्या राजकारणाचा खालावलेला दर्जा उघड झाला आहे, अशी भावना गायकवाड, काकडे, माळवदकर आणि देशमुख यांनी भाषणात व्यक्त केली. या प्रसंगी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. सोशल डिन्स्टन्सिंगचे नियम पाळून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

किरण राज यादव बारामती नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी
"आइन्स्टाईन'च्या सिद्धांताची झाली परीक्षा; गुरुत्वीय लहरींचा अभ्यास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP agitation in Pune by burning the statue of Gopichand Padalkar