करवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

तळेगाव स्टेशन - प्रशासनाने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या निषेधार्थ नगर परिषदेच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (ता. २०) धरणे आंदोलन केले. मालमत्ता कर जैसे थे ठेवण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

नगरपालिकेने २०१२ ते २०१८ पर्यंत केलेली करवाढ रद्द करावी, प्रत्यक्ष जागेवर जाऊन मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे, स्वच्छता कर संपूर्ण रद्द करावा, अजूनही नोटिसा न मिळाल्याने बहुतांशी मालमत्ताधारकांना हरकती नोंदवता आलेल्या नाहीत, त्यामुळे सुनावणी करताना सरसकट ३४ हजार मालमत्ताधारकांची करवाढ रद्द करावी, अशा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी वैभव आवारे यांना देण्यात आले.

आवारे यांनी दुपारी दोनच्या सुमारास आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. महागाईच्या आगडोंबात वाढीव कर भरणे सर्वसामान्यांना अशक्‍यप्राय आहे, सुनावणी घेण्याची पद्धत चुकीची असून, सुनावणी घेताना मालमत्ताधारकांची ओळख तपासावी, असा आग्रह नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांनी धरला. वाढीव मालमत्ता कर न भरल्यास वर्षाला २४ टक्के व्याजासह दंड भरावा लागणार असल्याने स्वतःच्या घरात राहण्यापेक्षा भाडेकरू म्हणून राहणे परवडेल, अशी टीका नगरसेवक किशोर भेगडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, स्टेशन राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आशिष खांडगे, कृष्णा कारके, अरुण पवार, दर्शन खांडगे, नगरसेवक अरुण माने, अरुण भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, बाबूलाल नालबंद, सुरेश धोत्रे, मिलिंद अच्युत आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी तीन वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.

भाजप नेत्याचा आंदोलनास पाठिंबा?
माजी नगराध्यक्ष तथा तळेगाव नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. रवींद्र दाभाडे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी हस्तांदोलन केल्याने सर्वांनीच आश्‍चर्य व्यक्त केले. त्यांची ही सदिच्छा भेट होती की पाठिंबा, अशी चर्चा नंतर रंगली होती.

...तर मोठा निरोप समारंभ
करवाढ रद्द केल्यास सर्व नागरिकांसह आम्ही वैयक्तिक पातळीवर आपणास धन्यवाद देऊ आणि मोठा निरोप समारंभ ठेऊ, अशी गळ बापूसाहेब भेगडे यांनी घालताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title: NCP Agitation for Tax Oppose