पुण्यात CAA वरून एफसी कॉलेजमध्ये राष्ट्रवादी-भाजप समोरासमोर; पहा काय घडले?

सकाळ
सोमवार, 23 डिसेंबर 2019

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सोमवारी पुण्यात महाविद्यालय बंदचे आवाहन केले होते. त्यास आज दिवसभरात प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी दोनच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्यालय बंद करण्यासाठी प्राचार्यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. पण कोणीच निवेदन स्विकारत नसल्याने प्राचार्यांच्या केबिनबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

पुणे : जामिया मिलिया इस्लामिया व अलहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात फर्ग्युसन महाविद्यालय बंद करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या केबीनबाहेर घोषणाबाजी सुरू केली. त्याच वेळी तेथे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र येऊन या कायद्याच्या बाजूने घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महाविद्यालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी व महाविद्यालयाने या हस्तक्षेप केल्याने दोन्ही बाजूने घोषणाबाजी थांबविण्यात आली.

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सोमवारी पुण्यात महाविद्यालय बंदचे आवाहन केले होते. त्यास आज दिवसभरात प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी दोनच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्यालय बंद करण्यासाठी प्राचार्यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. पण कोणीच निवेदन स्विकारत नसल्याने प्राचार्यांच्या केबिनबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

Image may contain: 16 people, people smiling, crowd, child and outdoor

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

Image may contain: 10 people, people smiling, crowd and shoes

दरम्यान, याची माहिती या कायद्याचे समर्थन करणारे भाजपचे काही कार्यकर्ते हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन तेथे दाखल झाले. राष्ट्रवादीकडून विरोधात घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी "We Support CAA...', "भारत माती की जय...' अशा घोषणा सुरू केल्या. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "संविधान झिंदाबाद...' च्या घोषणा सुरू केल्या. ते प्रकरण गंभीर होण्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना शांत केले.

Image may contain: 1 person, tree, sky and outdoor

खासदार अमोल कोल्हे म्हणतात, माहिती द्या बघतोच...

Image may contain: one or more people, tree, motorcycle and outdoor

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and BJP is face to face in FC College premises for CAA