esakal | Vidhan Sabha 2019 : राज्यात नाही, पुण्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या पाठिशी
sakal

बोलून बातमी शोधा

 NCP Youth Congress supports MNS candidate Kishore Shinde

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या कोथरूड मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 'शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर किशोर शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर' सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले.

Vidhan Sabha 2019 : राज्यात नाही, पुण्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या पाठिशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या कोथरूड मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 'शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर किशोर शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर' सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले.

याबाबत आपले मत व्यक्त करताना गिरीश गुरनानी म्हणाले, 'भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोथरूडमध्ये हिंदू सण संस्कृती जोपासणाऱ्या दहीहंडी आणि गणेश मंडळांवर पालक मंत्र्यांनी गुन्हे दाखल का केले? कोथरुडकरांनी आपल्या समस्या घेऊन आमदाराला शोधायला कुठे जायचे? कोथरूड वासियांच्या समस्या कोथरुडमधील रहिवासी आमदार जबाबदारीने सोडवू शकेल. या सर्व बाबींचा विचार करता कोथरुडचे अॅड किशोर शिंदे यांची भेट घेतली व त्यांना संपूर्ण पाठिंबा आणि प्रचार कार्यात सहाय्याचा विश्वास दिला.

संपूर्ण प्रचार कार्यात शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' चा सक्रिय सहभाग असेल, असे आश्वासन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर' सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी किशोर शिंदे यांना भेटी दरम्यान दिले.