Vidhan Sabha 2019 : 'मी आबांची लेक'; ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पुणे : पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात केली.

पुणे : पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात केली.

यावेळी कदम म्हणाल्या मला मतदार संघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे. त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा नक्की माघार घेतील असेही कदम यावेळी म्हणाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate Ashwini kadam rally for filing nomination form