प्रचारासोबतच मतदार जागृतीवर भर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - नवी पेठ-पर्वती प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्‍याम मानकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांची रामबाग कॉलनी, काका हलवाई दुकान, शास्त्री रस्ता परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आणि नागरिकांचे प्रश्‍नही समजून घेतले.

पुणे - नवी पेठ-पर्वती प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्‍याम मानकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांची रामबाग कॉलनी, काका हलवाई दुकान, शास्त्री रस्ता परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आणि नागरिकांचे प्रश्‍नही समजून घेतले.

यंदाची निवडणूक प्रभागातील चार उमेदवारांसाठी असून मतदानाची पद्धत, मतदान कसे करावे व मतदान का करणे आवश्‍यक आहे, हे समजावून सांगितले. या उपक्रमाबद्दल परिसरातील मतदार म्हणाले, ‘‘यात आम्हाला मतदानाविषयी चांगली माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही अचूक मतदान करू शकू. यापुढे मतदान करताना चूक होणार नाही.’’ या वेळी नागरिकांनी श्‍याम मानकर यांच्यापुढे परिसरातील वाढलेली वाहतूक, त्यातून निर्माण होणारी कोंडी, वाहन पार्किंगची समस्या मांडली. शिवाय येथे महापालिकेची कोठी असून कचरा गाड्याही इथे ठेवल्याने दुर्गंधी पसरते. या संबंधीच्या तक्रारी महापालिका क्षेत्रीय कार्यालयात केल्या; पण समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रारही रहिवाशांनी केली. या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही मानकर यांनी या वेळी दिली. काही ज्येष्ठ नागरिकांनी मानकर व त्यांच्या सहकारी उमेदवारांची भेट घेतली. मूलभूत सुविधा मिळण्याबरोबरच प्रभागातील समस्या दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचा कार्यक्रम घेऊन मतदारांसमोर जात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पक्षाने महापालिकेच्या माध्यमातून ठोस कार्यक्रम, नियोजनबद्धपणे पूर्ण केल्याचे मतदारांनी सांगितले. 

मानकर म्हणाले, ‘‘पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, वाहतूक, सार्वजनिक सुरक्षा, स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा, शिक्षण, वनीकरण, सौरऊर्जा, सार्वजनिक रस्ते, सांस्कृतिक कला, परंपरांचे जतन व संवर्धन, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मी प्राधान्य देणार आहे.’’

Web Title: ncp candidate shyam mankar