Vidhan Sabha 2019 : शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी दाखल केला अर्ज

NCP Candidate sunil tingre filed nomination from Hadapsar assembly constituency
NCP Candidate sunil tingre filed nomination from Hadapsar assembly constituency

वडगाव शेरी (पुणे) : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्तिप्रदर्शन करीत दाखल केला. वडगाव शेरी मध्ये गटातटात विभागलेले राष्ट्रवादी आज सुनील टिंगरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभी असलेली दिसल्यामुळे शक्ती प्रदर्शनात अनोखी चैतन्य पाहायला मिळाले.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर विस्कळीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची यानिमित्त दिलजमाई झाल्याचे पाहायला मिळाले.. माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश आप्पा म्हस्के, मागील वेळी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढलेले नारायण गलांडे, राजेंद्र खांदवे, पांडुरंग खेसे, काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे आदींची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

टिंगरेनगर, विद्यानगर येथून रॅलीला सुरुवात झाली . सुरुवातीला ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन रॅली येरवड्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. मागील विधानसभेत एकमेकांविरोधात लढलेले  राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि नारायण गलांडे यांनी सुनील टिंगरे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वडगावशेरी मतदारसंघातील टिंगरे आणि पठारे हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

याठिकाणी भाजपने विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली असून आता सुनील टिंगरे विरुद्ध मुळीक अशी सरळ लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासोबत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनाही या निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे. वडगाव शेरीतून मनसेचा उमेदवार कोण हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. सुनील टिंगरे हे बांधकाम व्यावसायिक असून ते स्थापत्य अभियंता आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com