लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाहून घेतले : शरद पवार 

ज्ञानेश सावंत
रविवार, 28 जुलै 2019

चित्रा वाघ घाबरल्या होत्या
चित्रा वाघ यांचे पती किशोर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्याबाबत वाघ मला भेटल्या आणि बचावासाठी पक्ष सोडून जात असल्याचे मला कळविले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असा खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले.

पुणे : सध्या सरकारकडून अन्य पक्षातील लोकप्रतिनिधींना धमकावून स्वतःच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांनी यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांची आज (रविवार) सकाळी पुण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर आरोप केले. सध्या राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी सरकारवर आरोप करत लोकप्रतिनिधींना धाक दाखवून पक्ष प्रवेश केला जात असल्याचे म्हटले आहे.

पवार म्हणाले, की देश व राज्यातील प्रमुख तपास यंत्रणांचा धाक दाखवून अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यात येत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आर्थिक अडचणीतील संस्थेच्या प्रमुखांना कायद्यापलीकडची आर्थिक मदत होत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री हे अन्य पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेत आहेत. या कामासाठी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. हसन मुश्रीफ यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. देशात पहिल्यांदाच राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे. भाजप नेते आता कर्नाटकनंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील सरकार अस्थिर करीत आहे. हा जनतेचा मनातील सरकरावर हल्ला होते आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतरात वाढ झाली आहे. ईडी, सीबीआयचा यासाठी वापर केला जात आहे.

चित्रा वाघ घाबरल्या होत्या
चित्रा वाघ यांचे पती किशोर यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्याबाबत वाघ मला भेटल्या आणि बचावासाठी पक्ष सोडून जात असल्याचे मला कळविले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असा खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar attacks BJP and Shivsena government