पाऊस असला तरी शरद पवार बारामतीत बरसणारच

मिलिंद संगई
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

बारामती शहर व तालुका परिसरात रात्री जोरदार पाऊस कोसळला. आज सकाळी पावसाचा जोर कायम होता . दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पाऊस पडत असल्याने शरद पवार यांची सभा होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

बारामती शहर : बारामती परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित सांगता सभा आज (ता. 19) दुपारी तीन वाजता मिशन ग्राउंड वर होणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख बाळासाहेब तावरे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष शिकलकर यांनी दिली.

बारामती शहर व तालुका परिसरात रात्री जोरदार पाऊस कोसळला. आज सकाळी पावसाचा जोर कायम होता . दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पाऊस पडत असल्याने शरद पवार यांची सभा होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

मात्र संभाजी होळकर यांनी आज दुपारी तीन वाजता मिशन ग्राऊंडच्या मैदानावर अजित पवार यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे हे सभा घेणार आहेत. अजित पवार हेही या सभेमध्ये आपल्या पुढील पाच वर्षांच्या कामकाजाविषयी विचार व्यक्त करणार असल्याचे संभाजी होळकर यांनी सांगितले .

दरम्यान सातारा येथे काल शरद पवार यांनी भर पावसात जे भाषण केले, त्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह दिसून येत आहे, कितीही पाऊस आला तरी या सभेला जायचेच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलयाचे संभाजी होळकर यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar hold rally in Baramati