Loksabha 2019 : शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट; सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला होता, त्या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे व इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये आज पुण्यात महत्वाची बैठक पार पडली.

इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला होता, त्या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, मात्र दोनच दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. आज स्वतः शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुकर होईल अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव व जवाहर वाघोलीकर हेही या बैठकीस उपस्थित होते.

Web Title: NCP chief Sharad Pawar meet Congress leader Harshvardhan Patil in Baramati