राष्ट्रवादीचा पाच पैकी तीन ग्रामपंचायतीेवर दावा

राजकुमार थोरात
रविवार, 3 जून 2018

इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. यातील तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने दावा केला आहे. नवनिवार्चित ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील लाकडी, काझड, शिंदेवाडी, वकिलवस्ती व बावडा ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये लाकडी व काझड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकला. येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विचाराचे सरपंच निवडून आले आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीवर ही आमदार भरणे यांनी दावा केला असून, पक्षात दोन गट पडल्यामुळे सरपंचपदाचा उमेदवाराचा केवळ दहा मतांनी पराभव झाला आहे. सध्या सरपंच पद विरोधी पक्षाकडे असले तरीही बहुमत राष्ट्रवादीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यातील तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने दावा केला आहे. नवनिवार्चित ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील लाकडी, काझड, शिंदेवाडी, वकिलवस्ती व बावडा ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये लाकडी व काझड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकला. येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विचाराचे सरपंच निवडून आले आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीवर ही आमदार भरणे यांनी दावा केला असून, पक्षात दोन गट पडल्यामुळे सरपंचपदाचा उमेदवाराचा केवळ दहा मतांनी पराभव झाला आहे. सध्या सरपंच पद विरोधी पक्षाकडे असले तरीही बहुमत राष्ट्रवादीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

यावेळी आमदार भरणे म्हणाले,  "गेल्या २० वर्षांपासून तालुक्याचा खुंटलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गतिमान झाला आहे. तालुक्यातील काझड, लाकडी, शिंदेवाडी ही गावे ही आजही राष्ट्रवादीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिली असून, परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थाने रुजली आहे. विरोधक बहुमताचे राजकारण करत आहेत. तालुक्यातील जनतेने गेल्या चारवर्षांत आलेला निधी व त्यातून तालुक्याचा झालेला विकास विरोधकांना सलत आहे. गावागावातील गट तट बाजूला ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे." असे आवाहन करुन भरणे यांनी माजी सकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

यावेळी नवनिर्वार्चित काझड गावचे सरपंच अजित पाटील, लाकडीच्या सरपंच द्रौपदा वणवे, सदस्य मनिषा झगडे, अजिनाथ नरुटे, प्रियांका नरुटे, सोमनाथ नरुटे, राजू मोरे, महादेव नरुटे, कल्पना नरुटे, सुवर्णा नरुटे, किसन खटमाडे, रेश्मा वणवे, मनीषा होडशीळ, अनिल गायकवाड, शोभा चव्हाण, लक्ष्मी वणवे, पंचायत समितीच्या सदस्या शीतल वणवे, काशिनाथ वणवे, आप्पासो ढोले, दादा वणवे, संजय ढोले, बापूराव पाटील, आप्पासो नरुटे, महादेव नरुटे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, बाळासाहेब पाटील, शुभम निंबाळकर, कालिदास राऊत आदी उपस्थित होते.
 

Web Title: NCP claims three out of five gram panchayats