राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत कामगिरीत पुणे अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यातील कामगिरी अन्य 10 महापालिकांच्या तुलनेत अव्वल ठरली आहे. त्याची नोंद पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी घेतली आहे. 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाच्या शहरात 33 टक्के जागा, तर यंदा 32 टक्के जागा निवडून आल्या आहेत. 

पुणे - महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यातील कामगिरी अन्य 10 महापालिकांच्या तुलनेत अव्वल ठरली आहे. त्याची नोंद पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी घेतली आहे. 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाच्या शहरात 33 टक्के जागा, तर यंदा 32 टक्के जागा निवडून आल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यातील सर्व शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांची नुकतीच बैठक झाली. त्यात प्रत्येक शहरातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यात पुण्यात 2012 च्या निवडणुकीत पक्षाने 152 जागा लढवून, 51 मिळविल्या होत्या, तर 2017 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर काही जागांवर आघाडी करण्यात आली होती. त्यामुळे 130 जागा लढवून 40 जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याचे शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी या बैठकीत स्पष्ट केले. 

महापालिकेतून पक्षाची सत्ता गेली असली, तरी शहरातील कॉंग्रेसची सदस्य संख्या 29 वरून 9 झाली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 29 वरून 2 झाली. शिवसेनेची 14 वरून 10 झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. कॉंग्रेस, मनसे आणि शिवसेनेची सदस्य संख्या घटल्यामुळे भाजपच्या जागा वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून गेलेल्या आणि विजयी झालेल्या 13 जणांचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे भाजपची लाट असतानाही पक्षाचे स्थान शहरात कायम ठेवण्यात यश आल्याचे चव्हाण यांनी सोदाहरण सांगितले. 

पुणे, ठाणे अव्वल ! 
पक्षाची अन्य महापालिकांतील कामगिरी (यंदाच्या निवडणुकीतील सदस्य संख्या व त्यापुढे 2012 च्या निवडणुकीतील सदस्य संख्या) 1- मुंबई 9 (13), 2- नागपूर 1 (6), 3- पुणे 40 (51), 4- नाशिक 6 (20), 5 - पिंपरी- चिंचवड 35 (82), 6- अकोला 5 (5), 7 - उल्हासनगर 4 (21), ठाणे 34 (34), सोलापूर 4 (16), अमरावती 0 (23). 

Web Title: ncp first in party