राष्ट्रवादीला येत्या सोमवारी पहिले मोठे खिंडार

उत्तम कुटे
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेसला येत्या सोमवारी (ता.28) पहिले मोठे खिंडार पडणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे राष्ट्रवादीतील समर्थक नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.महापालिका निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतरचे आतापर्यंतचे शहरातील हे सर्वात मोठे पक्षांतर आहे.तसेच राष्ट्रवादीतील ती सर्वात मोठी फूट असून त्यामुळे पुन्हा पालिकेत सत्तारुढ होण्यासाठी या पक्षाला आता निकराचा संघर्ष करावा लागणार आहे.यामुळे उद्योगनगरीच्या राजकीय समीकरणातही मोठा बदल होणार आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त (ता.27) आयोजित या कार्यक्रमातून ते आपले बळ मुख्यमंत्री आणि पक्षाचे शहरातील दुसरे आमदार (चिंचवडचे) आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनाही दाखवून देणार आहेत. यानिमित्ताने एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा पैलवान लांडगे यांचा बेत आहे. आगामी लोकसभा तयारीचे रणशिंगही ते यानिमित्ताने फुंकणार आहेत.किमान लाखभराची गर्दी यावेळी जमविण्याचा त्यांचा मानस आहे.भोसरी व्हिजन 2020 या अभियानाचे निमित्त करून राष्ट्रवादीला हा जोर का झटका त्यांचाच पूर्वीचा नगरसेवक देणार आहे. तसेच पक्षात नंतर येऊनही पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रथम फोडून ते जगताप यांच्यावर कुरघोडी करणार आहेत. जगतापही लांडगे यांच्याप्रमाणेच पूर्वी राष्ट्रवादीतच होते. गत विधानसभेला ते भाजपचे आमदार झालेले आहेत.त्यांचेही अनेक समर्थक नगरसेवक सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. 28 तारखेच्या पूर्वीच तो होणारही होता. मात्र,कुठे तरी माशी शिंकली आणि तो रेंगाला. ही संधी साधून लांडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आणून पक्षप्रवेशाचा हा घाट घातला आहे.त्यानंतर आता,जगताप समर्थकांच्याही भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.अशारितीने भाजपचे भोसरी आणि चिंचवडचे आमदार राष्ट्रवादीची दोन्हीकडून कोंडी करणा र आहेत. हे दोघेही शक्तीमान असून कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ त्यांच्यामागे आहे. त्यामुळे तीन महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीत हॅटट्रिक करणे आता राष्ट्रवादीला सोपे राहिलेले नाही.

लांडगे या तरुण आमदारांमागे तरुण कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे.त्यामुळेच त्यांनी गत विधानसभेला यशस्वी बंडखोरी केली. या जोरावरच त्यांनी आतापासून लोकसभेचीही तयारी सुरु केली आहे.तत्पूर्वी आपल्या पाठीराख्यांना पालिकेत मोठ्या संख्येने पाठवून भोसरीचा गड अभेद्य करण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठीच भोसरी व्हिजन 2020 त्यांनी तयार केले असून त्याव्दारे भोसरी सर करून शिरूर लोकसभा मतदारसंघ फत्ते करण्याचा या सरदाराचा मनुसबा आहे.

Web Title: ncp gets a big hit in pimpri chinchwad