अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादी देणार मोठी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी नुकतेच याबाबतचे संकेत दिले आहेत. भोसरीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पवार यांना कोल्हे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांना आता आगामी निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार आहे असे सांगितले.

पुणे : लोकसभेतील आपल्या भाषणांनी चर्चेत आलेले शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी नुकतेच याबाबतचे संकेत दिले आहेत. भोसरीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पवार यांना कोल्हे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांना आता आगामी निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार आहे असे सांगितले.

लोकसभेतून निवडून गेल्यानंतर डॉ. कोल्हे भोसरी मतदारसंघात येत नसल्याच्या तक्रारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केल्या. यावेळी पवार म्हणाले, की आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत. शेतकऱ्यांचे, बैलगाडय़ांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक पंतप्रधानांनीही केले. आगामी निवडणूक काळात त्यांना शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्याबरोबरीने राज्यभर फिरायचे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP gives huge responsibility to Amol Kolhe for assembly election