110- 52 सूत्रानुसार आघाडीची राष्ट्रवादीची इच्छा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : कॉंग्रेसबरोबर आघाडी करायची असेल, तर 110 आणि 52 असे जागावाटपाचे सूत्र असावे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केले. याबाबत पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांशी संवाद साधून कॉंग्रेसबरोबर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले, तर राष्ट्रवादीकडून ठोस प्रस्ताव आल्यावर आघाडीबाबत निर्णय घेऊ, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आघाडीबाबत दोन्ही पक्षांत विचारविनिमय सुरू झाला आहे. कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी 71 जागा मिळाव्यात, असे म्हटले आहे, तर राष्ट्रवादीचे सध्याचे संख्याबळ आणि ताकद लक्षात घेऊन जागावाटप करावे, असे मत वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. तसेच पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करून जागावाटपाबाबत कॉंग्रेसशी चर्चा केली जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

कॉंग्रेसने शहराध्यक्ष बागवे यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्षांतील विद्यमान नगरसेवकांच्या जागा त्या-त्या पक्षांना मिळाव्यात, तसेच 2012 च्या निवडणुकीत जो पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याला ती जागा मिळावी आणि उर्वरित जागा समप्रमाणात वाटून घ्याव्यात, या फॉर्म्युल्यावरही चर्चा होऊ शकते; परंतु राष्ट्रवादीकडून निश्‍चित प्रस्ताव आल्यावर आघाडीबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 
दरम्यान, राष्ट्रवादीमधील "कोअर टीम'ची बैठक दोन दिवसांत होणार आहे. त्यामुळे आघाडीबाबतची बैठक दोन दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. 
 
Web Title: ncp gives proposal to congress