राष्ट्रवादीचा हल्लाबोल आजपासून पुण्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला 2 एप्रिल रोजी कोल्हापूर येथून सुरवात झाली. सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यानंतर हे आंदोलन 10 ते 12 एप्रिलदरम्यान पुण्यात होणार आहे. 

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला 2 एप्रिल रोजी कोल्हापूर येथून सुरवात झाली. सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यानंतर हे आंदोलन 10 ते 12 एप्रिलदरम्यान पुण्यात होणार आहे. 

मंगळवारी (ता. 10) हे आंदोलन शिरूर, जुन्नर, खेड आणि भोसरीमध्ये होईल. तर, बुधवारी (ता. 11) मावळ, खडकवासला आणि चिंचवडसह दुपारी तीन वाजता वारजे येथील रसिकलाल माणिकचंद धारिवाल महाविद्यालयात आंदोलन होईल. गुरुवारी (ता. 12) दौंड, पुरंदरनंतर वडगावशेरी येथील झेन्सर मैदानावर रात्री साडेसात वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि चित्रा वाघ आंदोलनाच्या दरम्यान आयोजित सभांमध्ये बोलणार आहेत, असे पक्षाद्वारे कळविण्यात आले आहे. 

Web Title: NCP hallabol in pune