राष्ट्रवादीचा आजपासून पुण्यात हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - राज्य सरकारविरोधात रणशिंग फुंकून कोल्हापुरातून सुरू झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी (ता. ११) पुण्यात पोचणार आहे. त्यात, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. वारजे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर बुधवारी (ता. ११) दुपारी तीन वाजता सभा होईल. 

वारजे येथील सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मार्गदर्शन करतील. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वारजेनंतर येत्या गुरुवारी (ता. १२) खराडीतील झेन्सार मैदानावर सायंकाळी सात वाजता सभा होईल, असेही खासदार चव्हाण यांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रातील आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील सभांची तयारी झाली आहे. या सभांना प्रत्येकी २५ हजार लोक उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या. 

पैसा वाया घालविण्यावरच भर
पदभार सोडलेले महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना हाताशी धरून भाजप नेत्यांनी शहरात सल्लागारांचे राज्य निर्माण केले आहे. यामुळे पुणेकरांची आर्थिक लूट होणार आहे. प्रत्येक योजनेसाठी कोट्यवधी रुपये मोजून सल्लागार नेमले जात आहेत. पुणेकरांचे पैसे वाया घालविण्यावरच भाजपचा भर असल्याची टीका खासदार वंदना चव्हाण यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP hallabol in Pune today