Ajit Pawar
Ajit Pawar

बापाला पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आली : अजित पवार

पिंपरी : आज माझ्यावर काय वेळ आली. बापाला पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आली. गमतीचा भाग सोडून द्या. मी सुद्धा सुरुवातीला खूप कडक होतो आता नरमलो आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीतील वाल्हेकरवाडी येथे सभा घेण्यात आली. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, अजित पवार आदी नेते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ''चौकीदार चोर है, हे लोकांना का पटू लागलंय. कारण राफेलची कागदपत्रे चोरीला गेल्याचे हे सांगतात. कशी काय चोरीला जातात. कारण यात कोट्यवधीचा झालेला गैरव्यवहार समोर येऊ नये म्हणून हा आटापिटा चालला आहे. शिवसेनेबद्दल काय बोलावं, 25 वर्षे सडली म्हणता, मग कुठं चिटकायला गेले. राहुल गांधी म्हणतात चौकीदार चोर है अन् हे म्हणतात पहारेकरी चोर है. आता राम मंदिर, तिकडं वरती रामाला ही उचकी लागत असेल, निवडणूक आली असे वाटत असेल. स्वतःच्या वडिलांचं स्मारक बंधू शकत नाही अन निघाले राम मंदिर बांधायला. हे कुणा ऐऱ्या गैरयाचे हे काम नाही. मॅच फिक्सिंग कोणी करायची नाही. रात्री एक आणि दिवसा एक असं कोणी करायचं नाही. खपवून घेणार नाही. नितीन गडकरी म्हणतात, मलाच सत्तेत काम करू देत नाही. सुषमा स्वराज, उमा भारती निवडणूक लढवणार नाही म्हणतात. याचा काय अर्थ. हुकूमशाही खपवून घेऊ नका.''

1985 मध्ये शरद पवार यांनी या भागाचे नेतृत्व दिल्लीत केले. तेंव्हा देशात दोन नंबरच्या मताने पवारसाहेब निवडून आले. 1991 साली माझी पाटी कोरी होती, तेंव्हा शाम वाल्हेकरनी केलेलं भाषण ऐकून मी निम्मा गार झालो. मग मोरे साहेबांना विनवणी करू लागलो. तेंव्हा मनात असं आलं होतंच की एकदा का हातात सत्ता आली की मग यांना हिंगा दाखवतो अशी कोपरखळी. तेंव्हा मी निवडून आलो. डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मतदारांना हात जोडून विनंती करतो, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com