आंबा खाऊन मुलगा होणाऱ्या गुरुजींचे डोके तपासायची वेळ आली: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा समाज आंदोलन सुरु आहे. त्याला कुणाचे नेतृत्व नाही. तो एक प्रकारचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून चुकीचा, चिथावणी देणारी वक्तव्य केली जातात. पंढरपूरमध्ये वारीदरम्यान साप सोडणार असल्याचं विधान किंवा संभाषण कुणी केल असेल यावर माझा तरी विश्वास नाही, तरीदेखील तसं काही झाला असेल तर दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे

पुणे : पुर्वी गावातील गुरुजींना मान होता. पण काही गुरुजी समाजात द्वेषाची गरळ ओकत आहेत. माझा आंबा खाऊन मुलगा होईल अशी विधाने करणाऱ्या गुरुजींचे डोके तपासायची वेळ आली आहे. तर काही जण बेजबाबदार वक्तव्ये करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या वतीने पुण्यात गुरुजन गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, ज्येष्ठ नाट्यकर्मी कीर्ती शिलेदार, शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे- चाफेकर आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई सांकला यांचा यावेळी अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

अजित पवार म्हणाले, की मराठा समाज आंदोलन सुरु आहे. त्याला कुणाचे नेतृत्व नाही. तो एक प्रकारचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून चुकीचा, चिथावणी देणारी वक्तव्य केली जातात. पंढरपूरमध्ये वारीदरम्यान साप सोडणार असल्याचं विधान किंवा संभाषण कुणी केल असेल यावर माझा तरी विश्वास नाही, तरीदेखील तसं काही झाला असेल तर दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. त्यांच्यामध्ये हे संभाषण झाले समाजासमोर आणले गेले पाहिजे. 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात याव. आता मराठा समाजाचा अंत पाहू नये. आज बैठकीला मी अन् धनंजय मुंडे भूमिका मांडणार आहोत.

Web Title: NCP leader Ajit Pawar criticize Sambhaji Bhide and Chandrakant Patil