आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार

टीम ई-सकाळ
शनिवार, 14 डिसेंबर 2019

'मी जर ठरवलं तर कुणी आमदार होऊ शकत नाही,' असं एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.14) पुण्यात पहिल्यांदा भाषण केले. यावेळी सरपंच पदाची निवड, खातेवाटप या विषयांवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी एका नेत्याला आमदार करणार असल्याची घोषणाही केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता हा नेता नक्की कोण? तो कोणत्या पक्षाचा आहे? अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाआघाडी पक्षांच्या प्रचारानिमित्त 'शिवस्वराज्य यात्रा' आयोजित करण्यात आली होती. आणि याचवेळी हा तरुण नेता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला. आपल्या अमोघ वक्तृत्वामुळे लोकांना जागेवर खिळवून ठेवण्याची क्षमता या नेत्याच्या भाषणात आहे. हा नेता दुसरा-तिसरा कुणी नसून अमोल मिटकरी होय. 

- धक्कादायक : मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेत मोठा भ्रष्टाचार; कॅगचे ताशेरे

Image may contain: 1 person, smiling, close-up

'मी जर ठरवलं तर कुणी आमदार होऊ शकत नाही,' असं एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते. मात्र, आता त्यांनीच अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या तरुण नेत्याला आमदार करणार असल्याची घोषणा केली. अमोल मिटकरीं यानंतर पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. अजित पवारांनी घोषणा केल्यामुळे मिटकरींना विधान परिषदेची दारे खुली झाली आहेत.

- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेत 'हे' बदल...

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राज्यभरात अमोल मिटकरींनी आपल्या भाषणांद्वारे राष्ट्रवादीच्या सभा गाजविल्या. राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार ज्या ज्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले होते, त्या सर्व मतदारसंघात जाऊन मिटकरींनी जाहीर सभा घेतल्या होत्या. एखाद दुसरी जागा सोडता मिटकरींच्या सभांचा चांगला परिणाम निवडणूक निकालातून दिसून आला. यादरम्यान मिटकरी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या जाहीर सभांना प्रचंड गर्दी होत होती.   

- रितेशने शेअर केली जेनेलियासोबत पाहिलेल्या पहिल्या चित्रपटाची आठवण!

Image may contain: 1 person, playing a musical instrument, on stage and beard

सर्वसामान्य कुटुंबातील साधारण व्यक्ती ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदापर्यंतचा मिटकरींचा प्रवास खूप संघर्षाचा राहिला आहे. सरचिटणीसपदी नियुक्ती होण्यापूर्वी मिटकरींची भाषणे सोशल मीडियात चर्चिली जात होती. मात्र, जाहीर सभांमध्ये मिटकरींनी केलेल्या भाषणांच्या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत. 

अजित पवारांनीच मिटकरींना दिला राजकारणात ब्रेक!

बारामतीमध्ये शारदा व्याख्यानमाला ही दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावेळी जातीय ताण कमी करण्यासंदर्भात मिटकरींनी केलेले भाषण अजित पवारांना भावले. आणि मिटकरींचे कौतुक करत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्याची संधी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar has announced that he will now appoint Amol Mitkari to MLA