भर पावसात शरद पवार बोलले पण अजित पवारांचा रोड शो पावसाने रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत
सातार्यात ७९  वर्षाचे शरद पवार यांनी भर पावसात खणखणीत भाषण केले. त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. यात पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही मागे नाहीत. पण शहरात पडणार्या मुसळधार पावसाने रॅली सुरू करावी की नको? की थोडा वेळ थांबायचे अशी द्विधा मनस्थितीत झाली आहे.

पुणे : भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन मैदान गाजवलेले असताना, पुण्यात मात्र मुसळधार पावसाने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली खोळंबल्या आहेत. सकाळी ९ वाजता सुरू होणार्या रॅली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. हडपसर येथे अजित पवार यांनी रोड शो रद्द केला. तर, अनेक ठिकाणी  "थांब भाऊ जरा पाऊस कमी होऊ दे" असे म्हणत कार्यकर्ते घरातच आहेत. 

शनिवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसात  शक्तीप्रदर्शन करत संपूर्ण दिवस पिंजून काढण्यासाठी महायुती, आघाडीच्या उमेदवारांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी ९-१० वाजता रॅली सुरू होणार होत्या. सकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर तो काही वेळात थांबेल असा अंदाज होता, पण संततधार सुरूच आहे.सर्वांचे नियोजन बिघडून गेले आहे.  

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा हडपसर मतदारसंघातील रोड शो पावसाने रद्द केला. इतर मतदारसंघात हिच परस्थिती आहे. पाऊस कमी झाला की रॅली काढू असे म्हणत उमेदवार व कार्यकर्ते आडोशाला थांबून आहेत. अनेकांनी तर अद्याप घर ही सोडलेले नाही. 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत
सातार्यात ७९  वर्षाचे शरद पवार यांनी भर पावसात खणखणीत भाषण केले. त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. यात पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही मागे नाहीत. पण शहरात पडणार्या मुसळधार पावसाने रॅली सुरू करावी की नको? की थोडा वेळ थांबायचे अशी द्विधा मनस्थितीत झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar rally cancelled in Pune due to rain