पुण्यातील राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार गोंधळात; बैठकीकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

''गेले चार दिवस मी आणि आमदार सुनिल टिंगरे दोघेही पुण्यातच आहोत. काल महापौर निवडीसाठी महापालिकेत होतो. सरकारस्थापन झाल्याची माहिती टिव्हीवरुन कळाली'', असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले. तर, ''सरकार स्थापनेच्या घडामोडीबाबत कल्पना नसल्याचे, राष्ट्रवादीचे दुसरे आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण हादारले असताना, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार पक्षात काहीच घडले नाही, अशा भूमिकेत आहेत. नेमके काय घडले ? याबाबत कोणतीच कल्पना नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार आणि शहरध्यक्ष चेतन तुपे  यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा 

''गेले चार दिवस मी आणि आमदार सुनिल टिंगरे दोघेही पुण्यातच आहोत. काल महापौर निवडीसाठी महापालिकेत होतो. सरकारस्थापन झाल्याची माहिती टिव्हीवरुन कळाली'', असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले.'.

आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय?

'सरकार स्थापनेच्या घडामोडीबाबत कल्पना नसल्याचे, राष्ट्रवादीचे दुसरे आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले ''मला अद्याप कोणाचाही फोन आलेला नाही. मी अजूनही घरीच आहे. आज सकाळी झालेल्या सगळ्या घडामोडी मला टीव्हीवरून समजल्या. पक्षासोबत थांबायचे की, अजित दादांसोबत जायचे याविषयी मी अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल'' असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री 

विधानसभा निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे तुपे आणि टिंगरे यांचा समावेश आहे. 

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Chetan Tupe and Sunil Tingre comment on formation Of Government