रोहित पवार म्हणतात, अजित दादांमुळेच माझं लग्न झालं

टीम ई-सकाळ
Monday, 30 September 2019

पवार कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राजकारणात उतरली आहे. राष्ट्रवादीचे भावी नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या रोहित पवार यांचा रविवारी (ता.29) वाढदिवस साजरा झाला.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार. पवार कुटुंबीय गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट द्यायचा घेतलेला निर्णय, अजित पवार यांचा राजीनामा, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनीच घेतलेली पत्रकार परिषद या सर्व घडामोडींनी दोन दिवस दुसरीकडे कुठेच लक्षच जाऊ दिले नाही. 

पवार कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राजकारणात उतरली आहे. राष्ट्रवादीचे भावी नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या रोहित पवार यांचा रविवारी (ता.29) वाढदिवस साजरा झाला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तेव्हा त्यांनी अजित पवार हे नेमके कसे आहेत, यांच्याबद्दल रोहित यांना काय वाटतं? तेदेखील सांगितलं. खुद्द अजित पवार यांनीच माझं राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. खासगी आयुष्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पत्नी कुंतीशी विवाह ठरवण्यात दादांची भूमिका महत्त्वाची होती, असं सांगितलं. यावेळी पार्थ आणि आपल्यात कसल्याही प्रकारची स्पर्धा नव्हती, नाही असं स्पष्ट केलं. 

Image may contain: 5 people, people smiling, selfie

खास गोष्ट म्हणजे रोहित पवार आणि त्यांची पत्नी कुंती मगर-पवार या दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. आज माझ्यासोबत माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो. त्यामुळे आजचा पूर्ण दिवस कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो, असं रोहित यांनी फेसबुकवर प्रकाशित केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Image may contain: 4 people, people smiling, people sitting

रोहित पवार हे खासगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलतात, ते आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूरच ठेवतात. रोहित पवार हे पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक सतीश मगर यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयांमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. रोहित-कुंती या दांपत्याला दोन मुलीही आहेत. 'बाबा कुठे आहेत?' या मुलांच्या प्रश्नाला एकदा रोहित यांनी सोशल मीडियावरून तूच आई आणि तूच बाबा या भूमिका निभावते, याबद्दल त्यांच्या पत्नीचे कौतुकही केले होते.

रोहित हे शरद पवार यांचे चुलत नातू. शरद पवार यांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू आणि राजेंद्र पवार यांचे ते सुपुत्र होत. रोहित हे बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीचे संचालकही आहेत. राजकीय क्षेत्रात रोहित पवार यांच्या येण्याने सगळीकडेच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : युतीचे घोडे अडले आता 'या' दोन जागांवर

- भाजपकडून विधानसभेसाठी 32 उमेदवारांची यादी जाहीर

- Vidhan Sabha 2019 : भाजपचा पुन्हा 'विशेष कार्यक्रम'; काँग्रेसचे 6 आमदार गळाला?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Rohit Pawar shared his memories about his Marriage and Ajit Pawar