नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - "नव्या नोटांचा तुटवडा, जनतेच्या हाल-अपेष्टांचा आठवडा' अशा स्वरूपाच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गुरुवारी आंदोलन केले. पूर्वनियोजन न करता नोटा बंद करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे; तसेच भाजपचे खासदार, आमदार यांच्या घरांवर मोर्चे काढण्याचाही इशारा त्यांनी दिला. 

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला; पण त्यानंतर आठवडाभर सर्वसामान्यांचे हाल झाले. लोकांची अडचण लक्षात न घेता सरकारने आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप पक्षाकडून करण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसांत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदार व आमदारांच्या घरी मोर्चा काढण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी या वेळी दिला. महापौर प्रशांत जगताप, मोहनसिंग राजपाल, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, अशोक राठी, म. वि. अकोलकर, इक्‍बाल शेख आदी उपस्थित होते. पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आंदोलनाचे संयोजन केले होते. 

जगताप म्हणाले, ""नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय अविवेकी आहे. 2 ते 3 कोटी जनता असलेल्या देशात असे निर्णय सक्षमपणे राबविता येऊ शकतात; पण 130 कोटी जनता असलेल्या देशात अशा निर्णयाचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा बसत असेल, तर हा निर्णय उत्तम आहे; पण पूर्वनियोजन न केल्याने जनतेला जे सहन करावे लागत आहे त्याला जबाबदार कोण, हा प्रश्‍न पडतो.'' 

Web Title: NCP Movement against notabandi