Vidhan Sabha 2019 : आमचंच सरकार येईल : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

आज बारामतीत आम्ही सगळे मतदानासाठी आलो आहोत. राष्ट्रवादीने कायम विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. ईडीच्या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला नाही. भाजपचे दिगग्ज मंत्री आणि पदाधिकारी प्रचारासाठी आले यावरून कोणाचे पारडे जड आहे हे लक्षात आले असेलच.

बारामती : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला.

बारामती येथील रिमांड होम या मतदान केंद्रामध्ये आज (सोमवार) सकाळी खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभाताई पवार, रणजित पवार, शुभांगी पवार, इरा पवार, देवयानी पवार आदींनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचे आव्हान आहे.

सुळे म्हणाल्या की, आज बारामतीत आम्ही सगळे मतदानासाठी आलो आहोत. राष्ट्रवादीने कायम विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. ईडीच्या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला नाही. भाजपचे दिगग्ज मंत्री आणि पदाधिकारी प्रचारासाठी आले यावरून कोणाचे पारडे जड आहे हे लक्षात आले असेलच. यावेळी त्यांनी पावसाची तमा न बाळगता लोकांनी मतदान करावे असे आवाहन केले. राज्यात वातावरण बदलले असल्याचे चित्र सर्वांनीच पाहिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभांना तरुणांचा मिळणारा प्रतिसाद व राज्यांमध्ये त्यांच्या प्रत्येक सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद या बाबी विचारात घेता, या निवडणुकीमध्ये लोकांनी वेगळा विचार केला आहे. मतमोजणीनंतर वेगळे चित्र पाहायला मिळेल.

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये नगरपालिकेच्या हद्दीतील सातव वस्ती मतदान केंद्रांमध्ये सात वाजल्यापासून मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत. दुपारच्या वेळी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये बहुसंख्य मतदार मतदानावर गर्दी करताना दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule cast Vote in Baramati