झेडपीचा अध्यक्ष व्हायचंय?, तर पक्षाकडे लेखी अर्ज द्या        

NCP needs a written application for ZP president in Pune
NCP needs a written application for ZP president in Pune

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती आणि पंचायत समिती सभापती, उपसभापती आदी पदांसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना अगोदर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज असेल तरच संबंधित पदासाठी विचार केला जाणार आहे. यामुळे इच्छुकांना सरकारी नोकरीसाठी जसा अर्ज करावा तसाच अर्ज आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय पदांसाठीही करावा लागणार आहे.  

यानुसार इच्छुकांना यासाठी  १३ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यादिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. या अर्जासोबत व्यक्तीगत माहिती (बायोडाटा), आतापर्यंत पक्षासाठी केलेले काम आणि आपापल्या मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या विकासकामांचाही लेखाजोखा सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

हे अर्ज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनकवडी येथील कार्यालयात करण्याची सूचना या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सर्व सदस्यांना व्हाँटसप मेसेजेद्वारे बुधवारी (ता.११) सकाळी केली आहे. हा मेसेज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना पाठविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com