मेंगडेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व सरपंचपदासह नऊ पैकी सहा सदस्य विजयी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यासाठी धक्का
NCP panel Mengdevadi Gram Panchayat winning six out of nine members Balasaheb Mengde
NCP panel Mengdevadi Gram Panchayat winning six out of nine members Balasaheb Mengdesakal

पारगाव : मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री. गणेश ग्रामविकास पॅनेल व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत श्री. गणेश कृपा ग्रामविकास पॅनेल यांच्यात चुरशीची निवडणूक झाली सरपंचपदी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावळेराम मेंगडे विजयी झाले तर सदस्यपदाच्या एकूण नऊ जागांपैकी राष्ट्रवादी कॉँग्रेस पूरस्कुत श्री गणेश ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदासह सहा सदस्य निवडून आले तर बाळासाहेबांची शिवसेना पूरस्कुत श्री गणेश कृपा ग्रामविकास पॅनेलचे तीन सदस्य निवडून आले.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यासाठी धक्का मानला जात असून त्यांच्या पत्नी सुषमा गिरे यांचा सदस्यपदी निसटता विजय झाला आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावाशेजारील हे गाव तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण गिरे यांचे हे गाव असल्याने येथील निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मागील पंचवार्षिकला येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते यावेळी राष्ट्रवादी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात एकास एक चुरशीची निवडणूक झाली सरपंचपदी राष्ट्रवादीचे बाळासाहेब मेंगडे ७५५ मते मिळवून विजयी झाले तर पराभूत रविंद्र बबुशा भोर यांना ६९४ मते मिळाली.

विजयी उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री. गणेश ग्रामविकास पॅनेल - निलेश तुकाराम रणपिसे, जनार्दन विष्णू मेंगडे, कविता परशुराम मेंगडे, विशाल राजाराम गवारी, रेश्मा दत्तात्रय गवारी, सुजाता भाऊसाहेब टाव्हरे बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत श्री. गणेश कृपा ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार शुभांगी जयवंत मेंगडे, विशाल बाळासाहेब मेंगडे व सुषमा अरुण गिरे हे तीन सदस्य निवडून आले बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विशाल मेंगडे अवघ्या एक मतांनी तर सुषमा गिरे चार मतांनी विजयी झाल्या तर राष्ट्रवादीचे निलेश रणपिसे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com