राष्ट्रवादीला प्राधिकरणात खिंडार

- शिवाजी आतकरी
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

भाजप- शिवसेनेची मुसंडी - क्रॉस व्होटिंगने पॅनेलची गणिते चुकली
पिंपरी - मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग आणि नकारात्मक मतांनी पक्षांच्या पॅनेलची गणिते प्राधिकरणात चुकली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. मतदारांना गृहीत धरण्याची चूक राष्ट्रवादीच्या अंगलट आली.

प्रभाग पंधरामधून राजू मिसाळ निवडून आले; परंतु त्यांची मतांची आघाडी कमी राहिली. धनंजय काळभोर यांनी जोरदार लढत दिली; मात्र युती तुटल्याचा फायदा येथे राष्ट्रवादीला झाला. कारण, राजेश फलके या शिवसेनेच्या उमेदवाराने लागोपाठ दुसरा पराभव पचवताना तब्बल सहा हजार मते खाल्ली. शैलजा मोरे यांनी सव्वाचार हजार मतांनी मिळविलेला विजय एकतर्फी आहे. शर्मिला बाबर यांच्या रूपाने भाजपने दुसरे यश मिळविले. येथे लढत शिवसेना-भाजपमध्ये झाली. आर. एस. कुमार यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती मतदारांनी दिली. अमित गावडे यांच्या रूपाने शिवसेनेने येथे नेत्रदीपक विजय मिळविला.

निगेटिव्ह मतदान करून मतदारांनी उमेद्वारांप्रती नापसंती व्यक्त केली. भाजपने पहिल्या क्रमांकाची, शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. परिवर्तनाला साथ देताना विकासकामांकडे मतदारांनी दुर्लक्ष केले. हा संमिश्र निकाल क्रॉस व्होटिंगने दिला आहे. राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावे, शिवसेनेने हुरळून जाऊ नये, भाजपला पूर्ण साथ देणार नाही, असा निकाल प्राधिकरणातील मतदारांनी दिला आहे.

Web Title: ncp power decrease in pradhikaran