राष्ट्रवादी राबविणार "जिव्हाळा पंधरवडा' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने 30 जून ते 22 जुलैदरम्यान जिल्ह्यात "राष्ट्रवादी जिव्हाळा पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत "एक बूथ पंचवीस यूथ', गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप, कापडी पिशव्या बनविण्याचे मोफत प्रशिक्षण यांसारखे उपक्रम राबविणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""सुप्रिया सुळे यांना पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे. "घर तिथे राष्ट्रवादी' हे अभियानही राबविण्यात येणार आहे. सरकारने प्लॅस्टिकबंदी केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पक्षातर्फे मोफत कापडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.'' 

Web Title: NCP Pradeep Gartkar press conference