'मोदी सर्वात आवडते पण, शरद पवार यांचा अनुभव दांडगा' 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 23 April 2020

तरडे म्हणाले, "प्रत्येक पक्षात चांगले नेतृत्व आहे. राज्यातील नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते आवडतात. फडणवीस यांचे विचार तर्कशुद्ध आणि अभ्यासू आहेत. त्यांच्यात चांगली निर्णय क्षमता आहे. अजित पवार यांचा शेतीबद्दल दृष्टीकोन, सडेतोड आणि स्पष्ट भूमिका मला भावते.'' 

पिंपरी : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वात आवडते नेते आहेत.ते जगातील सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर, शरद पवार हे अभ्यासू राजकारणी असून, त्यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. नव्या पिढीत रोहित पवार यांचा दृष्टीकोन चांगला वाटतो," असे मत चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), पिंपरी चिंचवडच्या फेसबुक पेजवर लाईव्ह संवाद साधताना त्यांनी वरील मत प्रदर्शित केले. त्यांनी संघटनेच्या सदस्यांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. 

Praveen Tarde, director of Marathi film ‘Mulshi Pattern’, was allegedly assaulted by three men inside his office on Paud road on Sunday.

मोठी बातमी - ३ मे नंतर काय होऊ शकतं ? दुसऱ्या लॉक डाऊन नंतर तिसरा लॉक डाऊन ?

राजकीय नेते, संघटनांवर बोलताना तरडे म्हणाले, "प्रत्येक पक्षात चांगले नेतृत्व आहे. राज्यातील नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते आवडतात.  फडणवीस यांचे विचार तर्कशुद्ध आणि अभ्यासू आहेत. त्यांच्यात चांगली निर्णय क्षमता आहे. अजित पवार यांचा शेतीबद्दल दृष्टीकोन, सडेतोड आणि स्पष्ट भूमिका मला भावते. नवीन पिढीतील रोहित पवार यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे."

मोठी बातमी  रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, एक दिलासादायक बातमी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाची तुलना करणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलताना तरडे म्हणाले, "फडणवीस यांनी ५ वर्षे उत्तम काम केले. तर ठाकरे यांच्या सुरुवातीच्या ५ महिन्यांपैकी जास्त वेळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यावर खर्च झाला आहे. शिवसेना वेगळ्या आघाडीत असली तरी त्या पक्षाचा रंग आजही भगवा आहे. उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून चांगले असून भ्रष्टाचारी नाहीत."
 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तरडे आणखी काय म्हणाले... 
- छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर आदर्श, नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण नको.
- पालघर प्रकरणी धर्माचे राजकारण होत आहे हे वाईट, दोषींना मरेपर्यंत फाशी दिली जावी.
- चित्रपटसृष्टीत डाव्या आणि उजव्या विचारसरणीचा संघर्ष, उजव्या विचारसरणीचेही प्राबल्य. मी आरएसएसचा २५ वर्षे स्वयंसेवक. 
-  संभाजी ब्रिगेडबद्दल प्रत्येकाचे विचार वेगळे, संघटनेचा जन्म का झाला? त्यामागे कोणती शक्ती होती याचा अभ्यास व्हावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp president Sharad Pawar's experience is great says mulshi fame Praveen Tarde