Wed, Feb 1, 2023

Pune News : पथ विभागाच्या निविदेतील घोळा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
Published on : 20 January 2023, 4:59 pm
पुणे : महापालिकेने काढलेल्या रस्त्यांच्या कामाच्या निविदेत राजकीय दबाव आणल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेच्या समोर आंदोलन करून निषेध केला. तसेच या निविदेतील नियमात बदल करणार्यां अधिकार्यांची चौकशी करण्याची मागणी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
गेले ५ वर्ष महापालिकेत भाजप नगरसेवकांचे "टेंडरराज" सुरू होते, आता प्रशासकराज असतानाही तेच प्रकार घडत आहेत. या निविदेतील अटी -शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा काढावी व संबंधीत अधिकार्यांची चौकशी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
आमदार चेतन तुपे, राजलक्ष्मी भोसले, योगेश ससाणे, फारूक ईनामदार ,सुनिल बनकर,गफूर पठान, प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.